
सरकार घर खरेदी आणि बांधकाम स्वस्त करण्यासाठी जीएसटी दर कमी करण्याचा विचार करत आहे.
सिमेंट, स्टील, पेंट यांसारख्या मटेरियलवर कर कमी झाल्यास प्रोजेक्ट खर्च आणि घराची अंतिम किंमत कमी होईल.
याचा सर्वात मोठा फायदा मध्यमवर्गीय घरखरेदीदारांना होणार असून लक्झरी घरांवर उलटा परिणाम होऊ शकतो.
GST Rates on Construction Materials: घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच अशी योजना आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे घर बांधणे आणि खरेदी करणे दोन्ही स्वस्त होऊ शकते. सध्या घर बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंट, स्टील, टाइल्स, पेंट यांसारख्या मटेरियलवर वेगवेगळ्या दराने जीएसटी आकारला जातो. उदाहरणार्थ, सिमेंट आणि पेंटवर तब्बल 28% तर स्टीलसारख्या वस्तूंवर 18% जीएसटी आहे. यामुळे प्रोजेक्टची एकूण किंमत वाढते आणि त्याचा फटका थेट ग्राहकांना बसतो.