
CIBIL Score: सरकारी नोकरी मिळवणं म्हणजे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. त्यात जर ती नोकरी भारतीय स्टेट बँकेसारख्या प्रतिष्ठित बँकेत असेल, तर आनंदाला पारावार राहत नाही. मात्र, एका उमेदवाराचं स्वप्न CIBIL स्कोअर खराब असल्यामुळे भंग झालं आहे.
एका तरुणाची SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) मध्ये निवड झाली होती. पण त्याचा CIBIL स्कोअर खराब असल्यामुळे बँकेनं त्याला नोकरीवर घेतलं नाही.
बँकेनं स्पष्टपणे सांगितलं की, "जो स्वतःच्या आर्थिक जबाबदाऱ्याचं योग्य नियोजन करू शकत नाही, तो इतर ग्राहकांच्या कोट्यवधी रुपयांचं व्यवस्थापन कसं करेल?"