Export of EV : भारतातून ‘ईव्ही’ निर्यात करणारी ‘सिट्रॉन’ पहिली बहुराष्ट्रीय कंपनी

भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारींची परदेशात निर्यात करणारी ‘सिट्रॉन’ ही पहिली बहुराष्ट्रीय कंपनी ठरली आहे.
Export of  EV
Export of EVsakal

चेन्नई : भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारींची परदेशात निर्यात करणारी ‘सिट्रॉन’ ही पहिली बहुराष्ट्रीय कंपनी ठरली आहे. फ्रेंच वाहन उत्पादक कंपनी ‘सिट्रॉन’ने भारतातील उत्पादन प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या ‘ई-सी थ्री’ या मोटारींची निर्यात सुरू केली आहे.

‘सिट्रॉन’च्या ५०० ‘ई-सी थ्री’ मोटारी इंडोनेशियाला पाठवण्यात आल्या. ‘सिट्रॉन’चे हे पाऊल देशात जगासाठी शाश्वत इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे.

Export of  EV
Sakal Money : महागाईवर मात करणारी गुंतवणूक गरजेची ; ‘सकाळ मनी’ कार्यक्रमात शेअर बाजार आणि कमोडिटी गुंतवणूकतज्ज्ञांचा सल्ला

या वेळी स्टेलांटिस इंडियाचे सीईओ आणि एमडी आदित्य जयराज म्हणाले, ‘‘भारत ही केवळ स्टेलांटिस समूहासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ नाही, तर वाहने आणि मोबिलिटी तंत्रज्ञानासाठी एक प्रमुख स्रोत आहे. जागतिक स्तरावर भारताच्या उत्पादन कौशल्याचे प्रदर्शन करताना आम्ही भारताच्या वाढीसाठी आणि शाश्वत गतिशीलतेला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहोत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com