Commercial LPG Price Hike : निवडणुका संपताच सामान्यांना झटका! एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल १ हजारांची वाढ, काय आहे तुमच्या शहरातील ताजा दर?

LPG Cylinder Rates India : विविध शहरांमध्ये दरवाढीचे प्रमाण वेगवेगळे असून मुंबईत व्यावसायिक सिलिंडर ₹३,०२४ तर कोलकात्यात ₹३,२०२ झाला आहे. या दरवाढीमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लग्नसमारंभांच्या खर्चात वाढ होणार आहे.
Commercial LPG cylinders stacked for distribution as prices surge across major Indian cities from May 2026.

Commercial LPG cylinders stacked for distribution as prices surge across major Indian cities from May 2026.

esakal

Updated on

पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपताच, महागाईचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. १ मे २०२६ पासून सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये सुमारे १,००० रुपयांची मोठी वाढ केली आहे. परिणामी, दिल्ली आणि मुंबईसह देशभरातील अनेक शहरांमध्ये, व्यावसायिक एलपीजीच्या सिलिंडरचा दर आता ३,००० रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. मात्र घरगुती घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com