Computer Imports : चीनमधून संगणक आयातीत नोव्हेंबर ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत तीन टक्क्यांनी घट

चीनमधून देशात होणारी वैयक्तिक संगणकांची आयात नोव्हेंबर ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत तीन टक्क्यांनी घसरून ९१.७ कोटी डॉलरवर आली असल्याची माहिती आज वाणिज्य मंत्रालयाने दिली.
computer import
computer importesakal

Pune News : चीनमधून देशात होणारी वैयक्तिक संगणकांची आयात नोव्हेंबर ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत तीन टक्क्यांनी घसरून ९१.७ कोटी डॉलरवर आली असल्याची माहिती आज वाणिज्य मंत्रालयाने दिली.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान चीनमधून ९५ कोटी डॉलरची संगणक आयात झाली होती. त्याचप्रमाणे, नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जुलै ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील १.७५ अब्ज डॉलरच्या तुलनेत ४८ टक्क्यांनी घटून ९१.७ कोटी डॉलरची झाली आहे.

नोव्हेंबर-फेब्रुवारी २०२४ या कालावधीत देशातील वैयक्तिक संगणकांच्या आयातीतही वार्षिक ५५ टक्क्यांनी घट होऊन ती १.०६अब्ज डॉलरवर आली आहे. गेल्या वर्षी १९ ऑक्टोबर रोजी, सरकारने लॅपटॉप आणि संगणकांच्या आयातीवर निर्बंध आणले.

केवळ परवानाधारकांना आयात करण्याची परवानगी देण्यात आली. ऑगस्ट २०२३ मध्ये या आयातींवर परवाना प्रणाली लागू करण्याबाबत उद्योगांनी चिंता व्यक्त केल्यानंतर, सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या आयातीबाबतचे नियम सौम्य केले.

गेल्या वर्षी एक नोव्हेंबर रोजी, नव्या आयात प्रणालीच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी सरकारने सुमारे १० अब्ज डॉलर किमतीचे लॅपटॉप आणि संगणक यासारख्या आयटी हार्डवेअर उत्पादनांच्या आयातीसाठी परवानगी मागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या १११ अर्जांपैकी ११० अर्ज मंजूर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com