

Crypto Investment Tips: India’s Crypto Craze is Rising—Know These Rules First
eSakal
Crypto Investment Tips: आज जगभरात क्रिप्टोकरन्सी लोकांना आकर्षित करत आहे त्यामुळे यातील ट्रेंड वेगाने बदलत आहेत. या बदलांमध्ये भारताने पुन्हा आपली छाप सोडली आहे. क्रिप्टो स्वीकारण्याच्या बाबतीत भारताने अनेक विकसित देशांना मागे टाकत जागतिक पातळीवर आघाडी घेतली आहे.
Chainalysis 2025 च्या नवीन अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. या आकडेवारीवरून भविष्यात अर्थव्यवस्थेत डिजिटल अॅसेट्सची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचं दिसून येतं. मात्र, क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.