
Cryptocurrency Scam: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पेटीएम, रेझरपे, PayU, eBuzz आणि इतर चार पेमेंट कंपन्यांविरुद्ध तपास सुरू केला आहे. गेल्या दोन वर्षांत ईडीने या कंपन्यांच्या खात्यांमधील सुमारे 500 कोटी रुपये फ्रिझ केले आहेत. ही कारवाई काही चिनी नागरिकांकडून भारतात चालवल्या जात असलेल्या मोठ्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याबाबत करण्यात आली आहे.