Zomato: झोमॅटो देणार ॲमेझॉन फ्लिपकार्टला टक्कर; काय आहे कंपनीचा प्लॅन?

Zomato To Expand Blinkit: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो आपल्या 10 मिनिटांच्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ब्लिंकिटचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. इकॉनॉमिक टाईम्समधील एका अहवालानुसार, ब्लिंकिटमध्ये विविध उत्पादने जोडणार आहे.
Deepinder Goyal's plan for Zomato's Blinkit that may worry Amazon, Flipkart
Deepinder Goyal's plan for Zomato's Blinkit that may worry Amazon, FlipkartSakal

Zomato To Expand Blinkit: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो आपल्या 10 मिनिटांच्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ब्लिंकिटचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. इकॉनॉमिक टाईम्समधील एका अहवालानुसार, ब्लिंकिटमध्ये विविध उत्पादने जोडणार आहे.

झोमॅटोची ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टशी स्पर्धा

कंपनीचा विस्तार करून Zomato थेट Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांशी स्पर्धा करू शकते. झोमॅटो स्वतःची पुरवठा साखळी तयार करण्याची योजना आखत आहे. डायरेक्ट-टू-कंझ्युमर (D2C) क्षेत्रातील ही वाटचाल कंपनीसाठी दीर्घकालीन वाढ म्हणून पाहिली जात आहे. (Deepinder Goyal's plan for Zomato's Blinkit that may worry Amazon, Flipkart)

Deepinder Goyal's plan for Zomato's Blinkit that may worry Amazon, Flipkart
Online Shopping: ऑनलाइन शॉपिंगवर महिलांपेक्षा पुरुषांचा खर्च 36 टक्के जास्त; अहवालातून माहिती आली समोर

कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही

झोमॅटोने या धोरणाचा भाग म्हणून किमान दोनदा ई-कॉमर्स एनेबलर, शिप्रॉकेट विकत घेण्याचा आणि विलीन करण्याचा प्रयत्न केला होता. अहवालानुसार, ShipRocketने विलीनीकरणाची ऑफर नाकारली.

डिसेंबर तिमाहीत झोमॅटोचा निव्वळ नफा

Zomato ने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने वार्षिक आधारावर (YoY) 138 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तर कंपनीला मागील वर्षीच्या याच कालावधीत (FY23Q3) 347 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता.

Deepinder Goyal's plan for Zomato's Blinkit that may worry Amazon, Flipkart
Income Tax: मोदी सरकारच्या निर्णयामुळे छोट्या उत्पादकांना फटका; तब्बल 7,000 कोटींंचं होणार नुकसान

सप्टेंबर तिमाहीत (FY24Q2), कंपनी तोट्यातून सावरली आणि 36 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. त्याचवेळी, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 69 टक्क्यांनी वाढून 3,288 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर एका वर्षापूर्वी याच कालावधीत (FY23Q3) तो 1,948 कोटी रुपये होता.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com