

Dhanteras 2026: Silver Investment Guide – Silver Coins, Utensils or Silver ETF; Which Option Is Better?
esakal
Silver Investment Options: धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्यासोबत चांदी खरेदी करणंही शुभ मानलं जातं. यंदा 6 नोव्हेंबर 2026 रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या मुहूर्तावर तुम्हीही चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर चांदीची नाणी, भांडी किंवा सिल्व्हर एक्सचेंज ट्रेडेड फंड (Silver ETF) असे तीन पर्याय तुमच्यासमोर आहेत. या तिन्ही पर्यायांचे फायदे आणि मर्यादा वेगवेगळ्या आहेत. जाणून घेऊयात नेमकं कोणती गुंतवणूक जास्त फायद्याची आहे.