Diesel Windfall Tax: डिझेलवरील कराचा मोठा झटका! प्रतिलिटर १४ रुपये शुल्क... सरकारच्या निर्णयामागचं गणित काय?

Diesel Windfall Tax Increased to Rs 14 Per Litre : केंद्र सरकारने डिझेलवरील विंडफॉल टॅक्स प्रतिलिटर १४ रुपये केला असून विमान इंधनावरील शुल्कातही वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे १७ नोव्हेंबरचे दर मात्र कायम आहेत.
Government increases windfall tax on diesel exports to Rs 14 per litre and ATF export tax to Rs 12.50 per litre, while domestic petrol and diesel prices remain unchanged on November 17, 2026

Government increases windfall tax on diesel exports to Rs 14 per litre and ATF export tax to Rs 12.50 per litre, while domestic petrol and diesel prices remain unchanged on November 17, 2026

esakal

Updated on: 

केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनाच्या (एटीएफ) निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या विंडफॉल टॅक्समध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री उशिरा यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार डिझेलवरील निर्यात कर प्रतिलिटर ११.५० रुपयांवरून १४ रुपये करण्यात आला असून विमान इंधनावरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्क शून्यच ठेवण्यात आले आहे. दरम्यान, देशांतर्गत बाजारात विक्री होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या इंधन दरांमध्येही बदल झालेला नाही.

Loading content, please wait...