Diwali Bonus
Diwali BonusSakal

Diwali Bonus: बॉसने कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड! बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना भेट दिली कार

Diwali Bonus: Diwali Bonus: कंपनीने दिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना भेट दिली कार
Published on

Diwali Bonus: हरियाणातील पंचकुला येथील फार्मा कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी ही खास आहे. पंचकुलातील एका फार्मा कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचार्‍यांची मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांना 12 कर्मचाऱ्यांना कार दिवाळी भेट म्हणून दिल्या आहेत.

मिट्सकार्ट कंपनीचे मालक एमके भाटिया यांनी सांगितले की, ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी मानत नाहीत. माझ्यासाठी ते सगळे स्टार्स, सेलिब्रिटी आहेत. अनेक वर्षांच्या मेहनतीने आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी एक कंपनी बनवली आणि आज त्यांच्यामुळेच ते मोठ्या उंचीवर पोहोचले आहेत.

Diwali Bonus
RBI Action: RBI ची मोठी कारवाई, 4 मोठ्या बँकांना ठोठावला दंड, काय आहे कारण?

असे अनेक कर्मचारी आहेत ज्यांना गाडी कशी चालवायची हे देखील माहित नाही ते आता गाडी चालवायला शिकत आहेत. एमके भाटिया यांनी सांगितले की, ज्या कर्मचाऱ्यांना त्यांनी कार दिली आहे. त्यांनी रात्रंदिवस त्यांच्यासोबत काम करून कंपनीच्या उभारणीत मदत केली आहे. स्वतःची कार असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि मी माझ्या कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

Diwali Bonus
Share Market: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताय, थोडं थांबा हे वाचा! 2024 च्या लोकसभेचा....

ज्यांना दिवाळी गिफ्ट मिळाले त्यांच्यामध्ये कंपनीचा ऑफिस बॉय देखील आहे. विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्यांना गाडी कशी चालवायची हे देखील माहित नाही. कंपनी त्यांना भेट म्हणून कार देईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. कंपनीने ऑफिस बॉय मोहितला एक कारही भेट दिली आहे. भाटिया म्हणतात की, मोहित सुरुवातीपासूनच कंपनीसोबत आहे आणि पूर्ण मेहनत आणि समर्पणाने काम करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com