RBI Action: RBI ची मोठी कारवाई, 4 मोठ्या बँकांना ठोठावला दंड, काय आहे कारण?

RBI Action: नियमांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दंड ठोठावला आहे
RBI imposes monetary penalty on PNB, Federal Bank, 2 NBFCs
RBI imposes monetary penalty on PNB, Federal Bank, 2 NBFCs Sakal

RBI Action: नियमांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकेला (PNB) 72 लाख रुपये आणि खाजगी क्षेत्रातील फेडरल बँकेला 30 लाख रुपये दंड ठोठावला आहे.

KYC 2016 च्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल मर्सिडीज-बेंझ फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या सोबत कोसामत्तम फायनान्स लिमिटेड, कोट्टायमला 13.38 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

'कर्जावरील व्याजदर' आणि 'बँकांमधील ग्राहक सेवा' यासंबंधी काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल पंजाब नॅशनल बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे, असे आरबीआयने म्हटले आहे. सेंट्रल बँकेच्या दुसर्‍या प्रेस नोटमध्ये असे म्हटले आहे की केवायसी नियमांच्या काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे.

RBI imposes monetary penalty on PNB, Federal Bank, 2 NBFCs
Bajaj Auto: जगात पोहचलेलं 'हमारा बजाज' ऑटो पुण्यात कसं सुरू झालं?

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

गेल्या महिन्यात मध्यवर्ती बँकेने सुमारे 20 सहकारी, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दंड ठोठावला आहे. सर्वाधिक दंड ICICI बँकेला ठोठावण्यात आला आहे. सेंट्रल बँक वेळोवेळी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारते. मात्र त्याचा बँक खातेदारांवर कोणताही परिणाम होत नाही. ग्राहक पूर्वीप्रमाणेच त्यांच्या खात्यातून पैसे काढू आणि जमा करू शकतात.

RBI imposes monetary penalty on PNB, Federal Bank, 2 NBFCs
Reliance Retail: मुकेश अंबानींनी गुजरातमधील आणखी एक कंपनी घेतली विकत; 'इतक्या' कोटींना झाली डील

आरबीआय ही देशातील बँकिंग नियामक संस्था आहे, जी व्याजदरापासून बँकांपर्यंतचे बँकिंग नियम बनवते, ज्याचे बँकांना पालन करावे लागते. जर कोणत्याही बँकेने या नियमांकडे दुर्लक्ष केले किंवा त्याचे उल्लंघन केले तर आरबीआय त्या बँकेवर कारवाई करते. अनेक प्रसंगी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हिताचे रक्षण करताना बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com