

AC, TV, Fridge Prices Set to Rise From October 1; Check What Gets Costlier
eSakal
Diwali Shopping Gets Costlier: देशभरात येत्या काही दिवसांत नवरात्र, दसरा आणि त्यानंतर दिवाळीचा सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. मात्र, हा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ग्राहकांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. टीव्ही, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन आणि फ्रिजसह अनेक कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या 1 ऑक्टोबरपासून उत्पादनांच्या किमतीत सुमारे 5 ते 8 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या तयारीत आहेत. यंदाच्या वर्षात कंपन्यांकडून किमती वाढवण्याची ही तिसरी वेळ ठरणार आहे.