
Donald Trump Reciprocal Tariffs on India: डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच घोषणा केली की अमेरिका 2 एप्रिलपासून भारतावर रेसिप्रोकल टॅरिफ लावणार आहे. याचा सरळ अर्थ असा की, भारत अमेरिकन कंपन्यांकडून येणाऱ्या मालावर जेवढा कर लावेल, तेवढाच कर अमेरिका भारतीय कंपन्यांच्या मालावर लावणार. अमेरिकेच्या या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होईल आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा निर्णय का घेतला ते समजून घेऊया.