Trump Threatens India with Higher Tariffs in 24 Hours : भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत असून त्या तेलाचा मोठा भाग आंतरराष्ट्रीय बाजारात चढ्या किमतीत विकत असल्याचा आरोप, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणाही केली होती. मात्र, आता त्यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. येत्या २४ तासांत भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.