
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता ईरानबरोबर व्यापार करणाऱ्या 6 भारतीय कंपन्यांवर थेट निर्बंध लावले आहेत.
ट्रम्प प्रशासनाच्या या कारवायांमुळे भारताच्या महत्त्वाच्या उद्योगांना झटका बसला आहे.
याचा गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Donald Trump Tariff On India: भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी देणाऱ्या अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ईरान आणि रशिया यांच्यासोबत पेट्रोकेमिकल व्यवहार करणाऱ्या 6 भारतीय कंपन्यांवर थेट बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याची अधिकृत घोषणा केली असून, यामुळे भारतातील पेट्रोकेमिकल उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे.