
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या टेक कंपन्यांना भारतासह परदेशी कामगारांची भरती थांबवण्याचा इशारा देत अमेरिकेतच रोजगार निर्माण करण्याचे आवाहन केले.
एआय क्षेत्रातील वर्चस्वासाठी “Winning the Race” योजना आणली आहे. डेटा सेंटर्स उभारणी, एआय टूल्स आणि अमेरिकन एआय साधनांचा जागतिक प्रचार यावर भर देणार आहे.
भारतीय आयटी व्यावसायिक आणि आउटसोर्सिंग कंपन्यांसाठी भविष्यात अडथळे वाढण्याची शक्यता.
US President Donald Trump: वॉशिंग्टनमध्ये झालेल्या एआय समिटमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज टेक कंपन्यांना स्पष्ट सांगितले की, “आता चीनमध्ये कारखाने उभारणे किंवा भारतीय टेक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणे थांबवा आणि अमेरिकेतच रोजगार निर्माण करा.”