
सरकारी नोकरी मिळावी हे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी खूपजण धडपड करत असतात. मात्र काही लोक मात्र वेगळा विचार करतात. शिक्षण पूर्ण होताच नोकरीच्या मागे न लागता बिझनेसमध्ये उतरतात, पण डॉ. कामिनी यांनी वेगळा विचार केला, त्यांनी व्यवसाय करण्यासाठी सरकारी नोकरी सोडली. मात्र त्यांना लोकांनी वेड्यात काढले. पण त्यांचा निर्णय योग्य होता हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले. आज त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे 2 कोटींपर्यंत पोहोचली आहे.