

Dubai Farm: गुंतवणूकदारांना मोठ्या नफ्याचे स्वप्न दाखवून कंपनी कोट्यवधी रुपये घेऊन रातोरात फरार झाली आहे. एका दिवसापूर्वी कंपनीत 40 कर्मचारी काम करायचे, तिथे एक आलिशान कार्यालय होते, तिथे इंटरनेट आणि टेलिफोन लाईन्स होत्या. आता सगळंच गायब आहे. कंपनी एका रात्रीत गायब झाली आहे. कंपनीत फक्त कचऱ्याचे डबे उरले आहेत. ज्यांनी पैसे गुंतवले होते त्यांचा गोंधळ उडाला आहे.