
Anil Ambani Group
Sakal
Anil Ambani Group: प्रवर्तन संचालनालयाने (ED) अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) आणि कार्यकारी संचालक अशोक कुमार पाल यांना अटक केली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई बनावट बँक कागदपत्रे आणि खोट्या बिलिंगच्या प्रकरणात करण्यात आली आहे. दिल्लीतील ईडी कार्यालयात त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, अशोक कुमार पाल हे अनिल अंबानी यांचे जवळचे सहकारी मानले जातात.