
JSW Chairman Sajjan Jindal: इलॉन मस्कची कंपनी टेस्ला भारतात येण्याची शक्यता आहे. कंपनीने मुंबईत ऑफिसची जागा भाडेतत्त्वावर घेतली असून कर्मचाऱ्यांची भरतीही सुरू केली आहे. पण, जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष आणि एमडी सज्जन जिंदाल यांना भारतात टेस्लाच्या एन्ट्रीबद्दल शंका आहे. इलॉन मस्क भारतात यशस्वी होऊ शकत नाहीत, असे त्यांचे मत आहे.