
Elon Musk's Tesla: टेस्ला भारतात इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादन प्लांट उभारण्यासाठी जमीन शोधत आहे. टेस्ला कंपनी महाराष्ट्रात प्लांट उभारण्याची शक्यता आहे. असे ‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या (ET) अहवालात म्हटले आहे.
अहवालानुसार, टेस्लाने राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही सुरू केली आहे. इलॉन मस्क यांच्या अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.