

Pension Scheme Explained: Difference Between EPF and EPS in Simple Terms
eSakal
Provident Fund and EPFO : नोकरी करणाऱ्यांच्या संपूर्ण आयुष्याची बचत आणि भविष्याचा आधार असतो तो म्हणजे प्रोविडेंट फंड (PF) आणि पेन्शन स्कीम (EPS). पण अनेक कर्मचाऱ्यांना समजत नाही की त्यांच्या पगारातून कापलेली रक्कम कशी दोन भागांमध्ये विभागली जाते आणि निवृत्तीनंतर त्यांना किती पैसे मिळणार आहेत. EPFO च्या नियमांनुसार EPF आणि EPS दोन वेगळे आहेत. EPF म्हणजे तुमची एकरकमी बचत, तर EPS म्हणजे निवृत्तीनंतर मिळणारी निश्चित (गारंटीड) मासिक पेन्शन होय.