
Pension Hike
Sakal
Pension Hike: कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच आपल्या पेन्शनधारकांसाठी एक मोठा निर्णय घेऊ शकते. संस्थेची सर्वोच्च निर्णय घेणारी समिती म्हणजेच केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT) महत्त्वाची बैठक 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे. या बैठकीत सध्या ₹1,000 असलेली किमान पेन्शन थेट ₹2,500 प्रति महिना करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.