

EPFO Interest Rate Alert: PF Returns May Fall, Big Impact on Salaried Employees
eSakal
Provident Fund News : देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातच आता PF बाबत नवीन गोष्ट समोर येत आहे. जर तुमच्या पगारातून पीएफ (PF) कपात होत असेल, तर तुमच्यासाठी ही निराशाजनक बातमी ठरू शकते. कर्मचारी भविष्य निधी संघटनेची (EPFO) मार्च महिन्यात २३९ वी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज बैठक होणार आहे. या बैठकीत पीएफ ठेवींवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.