
EPFO Rule Change: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खाते हस्तांतरणाचे नियम सोपे केले आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यात किंवा खाते हस्तांतरित करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे 1.25 कोटींहून अधिक सदस्यांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
खरं तर, पीएफ कर्मचाऱ्यांना अनेकदा खाते हस्तांतरणाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असे. नोकरी बदलल्यानंतर त्यांना हे काम करावे लागत असे, परंतु आता ईपीएफओने यात सुधारणा केली आहे.