

EPFO WhatsApp Channel Launched: Get PF, Pension and Insurance Updates on Your Phone
eSakal
PF, EPS Pension and EDLI Updates on Whatsapp: नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी PF, पेन्शन आणि विम्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवणं आता सोपं होऊ शकतं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने आता स्वतःचं अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेल सुरू केलं आहे. या चॅनेलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना संस्थेच्या नव्या घोषणा, योजनांमधील बदल, महत्त्वाच्या तारखा आणि इतर अपडेट्स मोबाईलवर मिळू शकतात.