
Bima Sakhi Yojana Marathi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी हरयाणातून विमा सखी योजना लॉन्च केली. या योजनेचा उद्देश देशातील अर्ध्या जनतेला म्हणजेच महिलांना आर्थिक स्वरुपात सशक्त आणि आत्मनिर्भर करणं आहे. या योजनेचा भाग होणाऱ्या महिलांना 'विमा सखी' असं संबोधलं जाणार आहे. या महिलांचं काम म्हणजे आपल्या भागातील महिलांना विमा पॉलिसी काढण्यास प्रोत्साहित करणं आणि यासाठी त्यांना मदत करणं हे असणार आहे.