Trade Deficit : व्यापारी तूट चार महिन्यांच्या उच्चांकी; एप्रिलमध्ये निर्यातीत एक टक्का, तर आयातीत दहा टक्के वाढ

वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातून होणारी व्यापारी मालाची निर्यात एप्रिलमध्ये वार्षिक एक टक्क्याने वाढून ३४.९९ अब्ज डॉलर झाली आहे.
Trade Deficit
Trade Deficit Sakal

नवी दिल्ली : देशाची व्यापारी तूट एप्रिलमध्ये चार महिन्यांच्या उच्चांकावर गेली असून, ती १९.१ अब्ज डॉलर झाली आहे. मार्चमध्ये ती ११ महिन्यांतील नीचांकी, १५.६ अब्ज डॉलर होती, अशी माहिती आज येथे वाणिज्य मंत्रालयाने दिली.

वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातून होणारी व्यापारी मालाची निर्यात एप्रिलमध्ये वार्षिक एक टक्क्याने वाढून ३४.९९ अब्ज डॉलर झाली आहे. एप्रिल २३ मध्ये ती ३४.६२ अब्ज डॉलर होती. देशाची आयात एप्रिलमध्ये ५४.०९ अब्ज डॉलरवर गेली असून, एप्रिल २३ मधील ४९.०६ अब्ज डॉलरच्या तुलनेत त्यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२४ मध्ये निर्यात मार्च २०२३ मधील ४१.९६ अब्ज डॉलरवरून ४१.६८ पर्यंत कमी झाली होती.

एप्रिल २०२४ मध्ये सोन्याच्या आयातीत मार्चमधील १.५३ अब्ज डॉलरच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये ती ३.११ अब्ज डॉलरची झाली आहे. तर एप्रिल २०२३ मधील ४९.०६ अब्ज डॉलरच्या तुलनेत ती १०.२५ टक्क्यांनी वाढून ५४.०९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाची आयात मात्र, मार्चच्या तुलनेत काहीशी घटली आहे.

मार्चमध्ये तेलाची आयात १७.२३ अब्ज डॉलर होती, ती एप्रिलमध्ये १६.४६ अब्ज डॉलरवर आली आहे. एप्रिल २०२३ च्या तुलनेत मात्र, त्यात २०.२२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल २०२३ मध्ये व्यापारी तूट १४.४४ अब्ज डॉलर इतकी होती.

याआधीची तूट डिसेंबर २०२३ मध्ये १९.८ अब्ज डॉलर इतकी नोंदवली गेली होती. मार्च २०२४ मध्ये, निर्यात एका वर्षापूर्वी ४१.९६ अब्ज डॉलरवरून ४१.६८ अब्ज डॉलरवर घसरली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार,

एप्रिल २०२३ मधील २५.७८ अब्ज डॉलरच्या तुलनेत एप्रिलसाठी सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य २९.५७ अब्ज डॉलर आहे. एप्रिल २०२३ मधील १३.९६ अब्ज डॉलरच्या तुलनेत या महिन्यात सेवांची आयात १६.९७ अब्ज डॉलर आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी देशाच्या एकूण वस्तू आणि सेवांची निर्यात ७७८ अब्ज डॉलरवर गेली आहे, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. गेल्या आर्थिक वर्षात व्यापारी मालाची निर्यात ४३७ अब्ज डॉलर इतकी होती, तर सेवा क्षेत्राची निर्यात ३४१ अब्ज डॉलर होती. व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत, ३० प्रमुख क्षेत्रांपैकी १३ क्षेत्रांनी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत एप्रिलमध्ये सकारात्मक वाढ दर्शविली. यामध्ये कॉफी, तंबाखू, मसाले, प्लास्टिक आणि हस्तकला यांचा समावेश आहे.

ठळक वैशिष्ट्ये...

  • व्यापारी तूट चार महिन्यांच्या उच्चांकावर

  • एप्रिलमध्ये व्यापारी मालाची निर्यात ३४.९९ अब्ज डॉलर

  • आयात ५४.०९ अब्ज डॉलरवर

  • सोन्याची आयात मार्चच्या तुलनेत दुप्पट वाढून ३.११ अब्ज डॉलरवर

  • सेवा क्षेत्राची निर्यात २९.५७ अब्ज डॉलर

  • आयात १६.९७ अब्ज डॉलर

  • १३ क्षेत्रांची चांगली वाढ

इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, पेट्रोलियम उत्पादने आणि औषधनिर्माण यांसारख्या क्षेत्रातील उत्तम वाढीमुळे जागतिक आर्थिक अनिश्चितता असूनही निर्यातीत सकारात्मक वाढ नोंदविण्यात मदत झाली आहे. नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे आणि ती कायम राहील, अशी आशा आहे.

- सुनील बर्थवाल, वाणिज्य सचिव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com