
इन्स्टंट लोन अॅप्स तातडीचे कर्ज देतात, पण त्यावर व्याज आणि लपविलेले शुल्क जास्त असतात.
अनधिकृत अॅप्स वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून धमक्या देतात.
कर्ज घेण्याआधी अॅप RBI-नोंदणीकृत आहे का, अटी योग्य आहेत का याची खात्री करणे अत्यावश्यक आहे.
Instant Loan Trap: घरात अचानक एखादी वैद्यकीय आपत्ती येते, घरात आकस्मिक खर्च उभा राहतो किंवा कॉलेजची फी भरायची असते, अशा वेळी पैशांची तातडीची गरज भासते. या क्षणी अनेक जण "इन्स्टंट लोन अॅप्स"च्या पर्यायाचा विचार करतात. नावाप्रमाणे हे अॅप्स काही मिनिटांतच अकाउंटमध्ये पैसे जमा करतात. कागदपत्रांची कटकट नाही, बँकांच्या फेऱ्या नाहीत. फक्त मोबाईलवर क्लिक आणि कर्ज मिळतं. पण खरा प्रश्न असा की – हे कितपत सुरक्षित आहे?
गेल्या काही वर्षांत अशा अॅप्सच्या जाळ्यात अडकून अनेक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. काहींनी मानसिक त्रासातून आत्महत्याही केली आहे.