
15 ऑगस्टपासून NHAI खासगी गाड्यांसाठी ‘FASTag Annual Pass’ योजना सुरू करणार आहे.
एकदाच 3000 रुपये भरून 200 टोल क्रॉसिंग किंवा 1 वर्षापर्यंत मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
ही योजना निवडक राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर लागू होणार असून राज्य महामार्गावर लागू होणार नाही.
FASTag Annual Pass: राष्ट्रीय महामार्गांवरून वारंवार प्रवास करणाऱ्या खासगी वाहनधारकांसाठी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) 15 ऑगस्टपासून फास्टॅग एन्युअल पास ही नवीन सुविधा सुरू करत आहे. या पासमुळे वारंवार टोल रिचार्ज करण्याचा त्रास आणि टोल प्लाझावर लांबलचक रांगेत थांबण्याचा त्रास कमी होईल. प्रवास केवळ सोपा नाही तर स्वस्तही होईल.