Rules Change In November 2023: 1 नोव्हेंबरपासून होणार मोठे बदल, सणासुदीच्या काळात खिशावर होणार थेट परिणाम

New Rules From 1st November 2023: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात अनेक नियम बदलतात.
Financial changes coming into effect from November 1, 2023 check details
Financial changes coming into effect from November 1, 2023 check details Sakal

New Rules From 1st November 2023: ऑक्टोबर महिना संपायला 2 दिवस शिल्लक आहे. अशा परिस्थितीत 1 नोव्हेंबरपासून अनेक नियम बदलतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या बजेटवर होईल. एलपीजीच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवल्या जातात.

याशिवाय ई-इनव्हॉइस आणि काही उत्पादनांच्या आयातीचे नियमही बदलणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून बदलणाऱ्या या नियमांबद्दल जाणून घेऊया.

एलपीजी किंमत

एलपीजी सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ठरतात. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी नवीन किंमती जाहीर केल्या जातात. या काळात मागणी वाढल्याने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढू शकतात. सरकार किंमतीत बदल करणार नाही अशी शक्यता आहे.

ई-चलन

NIC नुसार, 100 कोटी किंवा त्याहून अधिक उलाढाल असलेल्या व्यवसायांना 1 नोव्हेंबरपासून 30 दिवसांच्या आत ई-चलन पोर्टलवर GST बिल अपलोड करावे लागतील. जीएसटीने सप्टेंबरमध्ये हा निर्णय घेतला होता.

Financial changes coming into effect from November 1, 2023 check details
Gold Rate Today: करवा चौथच्या आधी सोने महागले, दागिने घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचा भाव?

आयात संबंधित अंतिम मुदत

सरकारने HSN 8741 श्रेणीतील लॅपटॉप, टॅब्लेट, संगणकासह अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या आयातीवर 30 ऑक्टोबरपर्यंत सूट दिली होती. 1 नोव्हेंबरपासून काय होणार हे अद्याप कळलेले नाही. याबाबत सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही.

बंद केलेली एलआयसी पॉलिसी पुन्हा सुरू करा

तुमची एलआयसी पॉलिसी बंद झाली असेल तर ती 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू करा. तुम्ही 31 ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही त्रासाशिवाय ती पुन्हा सुरू करू शकता.

Financial changes coming into effect from November 1, 2023 check details
Jio World Plaza: भारतातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल 1 नोव्हेंबर पासून होणार सुरु

व्यवहार शुल्क

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईने 20 ऑक्टोबर रोजी जाहीर केले होते की ते 1 नोव्हेंबरपासून इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागावरील व्यवहार शुल्क वाढवतील. हे बदल S&P BSE सेन्सेक्स पर्यायांवर लागू होतील. व्यवहाराच्या वाढत्या खर्चाचा व्यापाऱ्यांवर, विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांवर परिणाम होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com