Chandrayaan 3 : 'चांद्रयान ३' कडून हे आर्थिक धडे प्रत्येकाने शिकायलाच हवेत!

याविषयी २५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेले फायनान्शियल मेंटोर किरांग गांधी यांनी मार्गदर्शन केले आहे.
Chandrayaan 3
Chandrayaan 3esakal

Everyone Should Take This Financial Lessons From Chandrayaan 3 :

अंतराळ सफारींनी मानवाच्या कल्पनाशक्तीला कायमच कोड्यात टाकले आहे. आपल्या ज्ञानाच्या आणि क्षमतांच्या कक्षा अंतराळ संशोधनामुळे रुंदावल्या आहेत. भारताच्या इस्रो अर्थात 'इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन' या अंतराळ संशोधन संस्थेने 'चांद्रयान ३' यशस्वी चंद्रावर उतरवले आहेत.

या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राबद्दल आणि आपल्या अंतराळाबद्दल माहिती गोळा करण्याचा इस्रोचा मानस आहे. या मोहिमेच्या निमित्ताने, 'चांद्रयान ३' च्या आजवरच्या प्रवासाकडे पाहिल्यास त्यातून अनेक आर्थिक धडे आपल्या रोजच्या जगण्यातील आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने घेता येतील. याविषयी २५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेले फायनान्शियल मेंटोर किरांग गांधी यांनी मार्गदर्शन केले आहे.

बजेटिंग आणि नियोजन: आर्थिक यशाचा लाँचपॅड!

भारताचं चांद्रयान प्रत्यक्ष चंद्राकडे प्रक्षेपित झालं त्याआधी कित्येक महिने, वर्ष त्याचं नियोजन सुरू होतं. प्रत्येक गोष्टीचा अत्यंत काटेकोर अभ्यास करून, सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून ते यान सज्ज करण्यात आलं होतं. आर्थिक नियोजनाच्या बाबतीतही असंच काटेकोर नियोजन आवश्यक असतं. आपल्याला भविष्यात किती पैशांची गरज असणार आहे, याचा विचार करून तयार केलेल्या बजेटमुळे सगळे खर्च सांभाळून आर्थिक उद्दिष्ट्य साध्य करणं सोपं होतं. आपल्या प्रगतीचा थेट आलेख आपल्या डोळ्यासमोर राहतो.

रिस्क मॅनेजमेंट: अज्ञात प्रांताचा प्रवास

कोणत्याही अंतराळ मोहिमेत रिस्क ही असतेच, तशी ती आर्थिक नियोजन करतानाही असते. चांद्रयानाला असलेल्या रिस्कचा आपल्या शास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास केला आणि त्या शक्य तितक्या टाळण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे प्रत्येकाने गुंतवणूक किंवा बचत करताना असलेल्या रिस्कचा विचार करून त्याप्रमाणे गुंतवणूक करणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी काही योग्य पर्याय निवडून त्यात विभागून पैशांची गुंतवणूक केल्यास रिस्क टाळता येऊ शकते.

Chandrayaan 3
Chandrayaan -3 : चंद्रावर जायचे कशासाठी ?

दूरदृष्टी: ताऱ्यांच्या पलीकडे जाण्यासाठीचा संयम

चांद्रयान ३ सारखी खडतर अंतराळ मोहीमेचं नियोजन करून ती यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनतीची, दूरदृष्टीची आणि संयमाची आवश्यकता असते. वैयक्तिक आर्थिक नियोजनातही ते तत्व तंतोतंत लागू होतं. अंतराळ मोहिमेला ज्याप्रमाणे नवनवीन माहिती शोधण्यासाठी संयम आणि वेळ द्यावा लागतो, तसेच आर्थिक गुंतवणुकीचे योग्य फळ मिळण्यासाठी संयमाची गरज असते. त्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचे नियोजन केल्यास प्रत्येक व्यक्तीला मार्केटमध्ये दीर्घकाळात होणाऱ्या वाढीचा लाभ घेता येईल.

ज्ञान आणि संशोधन: आर्थिक क्षितिजे न्याहाळताना

अंतराळ मोहीम निश्चित करण्याच्या आधी शास्त्रज्ञ आपल्याला अंतराळात जिथे जायचे आहे त्या जागेचा, ग्रहाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करतात. तिथल्या परिस्थितीबद्दल दीर्घकाळ संशोधन करतात. त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन करतानाही प्रत्येकाने मार्केटचा, तिथल्या जोखमींचा आणि संधींचा बारकाईने अभ्यास करायला हवा. अभ्यास करून निर्णय घेणे हा आर्थिक नियोजन यशस्वी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग होय. अशा पद्धतीने नियोजन केल्यास तुमच्या गुंतवणुक आणि बचतीतून असलेल्या अपेक्षा लवकर पूर्ण होतात.

Chandrayaan 3
Chandrayaan 3 : चार वर्षांपासून झोप नाही

एकमेका साह्य करू...

अंतराळ मोहीम यशस्वी करण्यासाठी अनेक विषयातले तज्ज्ञ आणि संशोधक एकत्र येतात. आर्थिक नियोजनातही असा दृष्टिकोन ठेवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. गुंतवणूक किंवा बचत करताना अनुभवी फायनान्शियल कोच, कर सल्लागार यांची मदत घेतली पाहिजे. ज्या गोष्टी सामान्य माणसाला दिसत नाहीत त्या लक्षात आणून देण्याचं काम हे लोक करत असतात. अनेकांचे ज्ञान आणि परिश्रम एकत्र आल्यानंतर चांद्रयान ३ सारखी अंतराळ मोहीम यशस्वी होणार असते, त्याचप्रमाणे आपलं आर्थिक नियोजन यशस्वी होण्यासाठी तज्ञ व्यक्तींचे ज्ञान एकत्र आणण्याची गरज असते.

उशिरा मिळणारे यश

कोणतीही अंतराळ मोहीम यशस्वी होण्यासाठी खूप मोठा काळ जावा लागतो. अशी मोहीम पार पाडण्यासाठी वेळ जाऊ देण्याची तयारी असावी लागते. त्यातून तुलनेने उशिरा समाधान मिळत असते. वैयक्तिक आर्थिक नियोजन करताना अशा उशिरा मिळणाऱ्या समाधानासाठी स्वतःला तयार करायला हवं. भविष्याचा विचार करून बचत किंवा गुंतवणूक करताना आज अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल, परंतु त्यातूनच आपलं सुरक्षित भवितव्य आकार घेत असतं. त्यातूनच आपली आर्थिक उन्नती होणार असते.

चांद्रयान ३ चा प्रवास हा मानवाला अंतराळाबद्दल असलेल्या उत्सुकतेचा आणि त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरून ज्ञानाच्या कक्षा विस्तारत नेण्याचा प्रवास आहे. वैज्ञानिक यशाच्या पलीकडे जाऊन या मोहिमेने आपल्या रोजच्या जगण्यात उपयोगी ठरतील असे आर्थिक नियोजनाचे धडे आपल्याला दिले आहेत. बजेटिंग आणि प्लॅनिंगपासून ते दीर्घकालीन यशासाठी लागणाऱ्या संयमापर्यंत अनेक गोष्टी या मोहिमेकडून आपल्याला शिकता येतील.

वर दिलेल्या ७ गोष्टींचा अवलंब केल्यास जीवनात आर्थिक यश मिळवणं, त्यासाठी नियोजन करणं प्रत्येकालाच शक्य होईल. एका ठरावीक उद्देशाने आणि आत्मविश्वासाने आपण आर्थिक नियोजन करू शकू. भारताच्या चांद्रयान ३ या यशस्वी मोहिमेकडून या गोष्टी शिकून आपापल्या आयुष्यात त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केल्यास आपलं आर्थिक उद्दिष्ट गाठणे प्रत्येकालाच सोपं होईतो यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com