Sovereign Gold Bond: 'या' सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट, तुम्ही गुंतवणूक केली आहे का?

Sovereign Gold Bond Return: योजनेतील गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होणार आहेत.
First Sovereign Gold Bonds batch to mature on November 30 What is this scheme
First Sovereign Gold Bonds batch to mature on November 30 What is this scheme Sakal

Sovereign Gold Bond Return: सार्वभौम गोल्ड बाँडचे गुंतवणूकदार मालामाल होणार आहेत. सार्वभौम गोल्ड बाँड 30 नोव्हेंबर रोजी मॅच्युअर होत आहे. हे बाँड 26 नोव्हेंबर 2015 रोजी सरकारी योजनेंतर्गत जारी करण्यात आले होते. या योजनेतील गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होणार आहेत.

यापूर्वी सार्वभौम गोल्ड बाँडची इश्यू किंमत 2,684 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली होती. The Economic Times अहवालात असे म्हटले आहे की, सार्वभौम गोल्ड बाँडच्या पहिल्या हप्त्याच्या मॅच्युरिटीची किंमत प्रति युनिट 6,132 रुपये निश्चित केली गेली आहे.

अशा प्रकारे पाहिल्यास, सार्वभौम गोल्ड बाँडच्या पहिल्या हप्त्याच्या गुंतवणूकदारांनी 128.5 टक्के कमाई केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक दर आर्थिक वर्षात सार्वभौम गोल्ड बाँड जारी करते. सध्या कोणताही गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 4 किलोपर्यंत गुंतवणूक करू शकतो. सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये किमान गुंतवणूक 1 ग्रॅम आहे.

सार्वभौम गोल्ड बाँडचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदार मुदतपूर्तीपूर्वी त्यांचे पैसे काढू शकतात. परंतु पहिल्या पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतरच गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढू शकतात. गुंतवणूकदारांनी या बाँडमधील त्यांची गुंतवणूक किमान 5 वर्षे ठेवणे आवश्यक आहे.

सार्वभौम गोल्ड बाँड योजना काय आहे?

तुम्ही Sovereign Gold Bond मध्ये गुंतवणूक करून FD आणि इतर गुंतवणुकीसारखे व्याज उत्पन्न मिळवू शकता. Sovereign Gold Bond या योजनेत तुम्ही प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन सोने खरेदी करू शकता. तुम्ही या बाँडवर कर्ज देखील घेऊ शकता.

First Sovereign Gold Bonds batch to mature on November 30 What is this scheme
Guru Nanak Jayanti: गुरु नानक जयंतीनिमित्त आज शेअर बाजार, बँका आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी

सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये कशी गुंतवणूक कराल?

1. डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा पर्याय आहे.

2. 2015 मध्ये सरकारने सार्वभौम गोल्ड बाँड सुरू केले.

3. बँकांमधून ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकता.

4. ऑनलाइन खरेदीवर 50/ग्रॅम सूट.

5. पोस्ट ऑफिसमधूनही खरेदी करता येईल.

6. स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनद्वारे खरेदी करणे शक्य आहे.

7. BSE आणि NSE प्लॅटफॉर्मवरूनही खरेदी शक्य आहे.

8. बँक खाते असणे आवश्यक आहे.

First Sovereign Gold Bonds batch to mature on November 30 What is this scheme
Dharavi Project: मुंबईतील धारावी प्रकल्पाबाबत अदानी समूहावर आरोप, करार रद्द करण्याची मागणी

सार्वभौम गोल्ड बाँडचे फायदे

1. वार्षिक 2.5% व्याज, सहामाही व्याज दिले जाते.

2. GST अंतर्गत नाही, भौतिक सोन्यावर 3% GST.

3. गोल्ड बॉण्ड्समध्ये हस्तांतरणाचा पर्याय देखील.

4. बाँडवर देखील कर्ज घेण्याचा पर्याय.

5. शुद्धतेची समस्या नाही.

6. मुदतपूर्तीनंतर कर नाही.

7. घरी ठेवण्याचा त्रास नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com