
Loan Interest Rate Cut: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या आठवड्यात महत्त्वाचा निर्णय घेत रेपो रेटमध्ये 0.5 टक्क्यांची कपात केली. त्यामुळे सध्या रेपो रेट 5.5 टक्के आहे. यासोबतच रोख राखीव प्रमाण (CRR) मध्येही 1 टक्क्यांची कपात करण्यात आली.
यानंतर आता देशातील अनेक बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे होम लोन, कार लोन, पर्सनल लोन आणि एमएसएमई लोन घेणाऱ्या ग्राहकांना थेट फायदा होणार आहे.