FMCG : ग्रामीण मागणीने ‘एफएमसीजी’ तेजीत

Finance News : पाच तिमाहीत प्रथमच शहरी क्षेत्रावर आघाडी; तिमाहीत ६.५ टक्के वाढ
एफएमसीजीत तिमाहीत ६.५ टक्के वाढ
एफएमसीजीत तिमाहीत ६.५ टक्के वाढesakal

Finance : देशातील गृहोपयोगी वस्तूंच्या उद्योगाने (एफएमसीजी) जानेवारी ते मार्च २०२४ या तिमाही कालावधीत ६.५ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. ग्रामीण बाजारपेठेतून मागणी वाढल्याने ही वाढ झाली असून, ग्रामीण बाजारपेठेने मागणीच्या पातळीवर पाच तिमाहीत प्रथमच शहरी क्षेत्राला मागे टाकले आहे, असे जागतिक विश्लेषण संस्था ‘निल्सन आयक्यू’ने तिमाही अहवालात म्हटले आहे.

एफएमसीजीत तिमाहीत ६.५ टक्के वाढ
Finance News : अपडेटर सर्व्हिसेजचा आयपीओ, सेबीकडे कागदपत्र दाखल...

या अहवालानुसार, नव्या कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी ते मार्च २०२४ या पहिल्या तिमाहीत खाद्यपदार्थ आणि बिगर खाद्यपदार्थ या दोन्ही श्रेणींनी उद्योगाच्या वाढीत योगदान दिले असून, खाद्यपदार्थांच्या तुलनेत बिगर खाद्यपदार्थांच्या श्रेणीने जवळपास दुप्पट वाढ नोंदवली आहे.

‘एफएमसीजी’ उद्योगाने राष्ट्रीय स्तरावर प्रमाणामध्ये ६.५ टक्के आणि मूल्यामध्ये ६.६ टक्के वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत प्रमाणात झालेली वाढ आर्थिक वर्ष २०२३ मधील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ३.१ टक्क्यांनी अधिक आहे.

गृहोपयोगी वस्तू आणि वैयक्तिक निगा श्रेणीतील उत्पादनांनी खाद्यपदार्थ श्रेणीच्या तुलनेत बाजी मारली आहे. खाद्यपदार्थ श्रेणींमध्ये खरेदीचे प्रमाण अधिक असले, तरी गृहोपयोगी वस्तू आणि वैयक्तिक निगा श्रेणीतील मोठ्या पॅकमधील उत्पादने लोकप्रिय असल्याने मूल्यात्मक पातळीवर त्यांनी आघाडी घेतली आहे. शहरी आणि आधुनिक व्यापाराचा वेग मंदावला आहे, तर ग्रामीण आणि पारंपरिक व्यापारात तेजी आहे.

जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये ग्रामीण भागात वस्तू वापराचा वेग वाढला असून, शहरी मागणीतील वाढीला ग्रामीण भागाने मागे टाकले आहे. शहरी भागात मागणीत ५.७ टक्क्यांपर्यंत घट दिसून आली आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रिटेल क्षेत्रामध्ये, आधुनिक व्यापाराने १४.७ टक्क्यांची मजबूत दुहेरी अंकी वाढ दर्शविली आहे, तर पारंपरिक व्यापारात स्थिर वाढ झाली असून, त्यात मागील तिमाहीतील ५.३ टक्क्यांच्या तुलनेत या तिमाहीत ५.६ टक्के वाढ नोंदवली गेली.

एफएमसीजीत तिमाहीत ६.५ टक्के वाढ
Economic Income : आर्थिक कमाईत भाजपची आघाडी! तिजोरीत २ हजार ३६१ कोटी जमा; उत्पन्नामध्ये काँग्रेस दुसऱ्या स्थानी

ठळक वैशिष्ट्ये

  •  प्रमाणामध्ये ६.५ टक्के आणि मूल्यामध्ये ६.६ टक्के वाढ.

  •  खाद्यपदार्थ श्रेणीतील वाढीचा दर ४.८ टक्के.

  •  बिगर खाद्यपदार्थ श्रेणीत ११.१ टक्के वाढ.

  •  छोट्या कंपन्यांची बिगरखाद्यपदार्थ श्रेणीत प्रमाणाच्या स्तरावर आघाडी.

  •  खाद्यपदार्थ श्रेणीत किमती स्थिर ठेवण्याचे आव्हान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com