

Will Soap, Biscuits and Cooking Oil Become Costlier After Diwali?
eSakal
Why are FMCG companies considering price hikes in India: सध्या सणासुदीच्या काळात कंपन्या ग्राहकांना डिस्काउंट देत असल्या, तरी दिवाळीनंतर सर्वसामान्यांच्या घरखर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. पाम तेल, साखर आणि पॅकेजिंग साहित्य महागल्यामुळे FMCG कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. सप्टेंबर तिमाहीत या वाढत्या खर्चाचा परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर आणि ऑपरेटिंग मार्जिनवर दिसून आला. कच्च्या मालाच्या किमती अशाच चढ्या राहिल्या, तर डिसेंबरपासून साबण, खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापरातील इतर वस्तू महाग होऊ शकतात असा अंदाज आहे.