

From ₹10,000 Salary to ₹400 Crore Empire: The Inspiring Journey of a Self-Made Entrepreneur
eSakal
तुम्हाला विश्वास बसणार नाही की एका व्यक्तीने 10 हजार रुपयांच्या पगाराने करियरची सुरुवात केली आणि आज तब्बल 400 कोटी रुपयांच्या कंपनीचे ते मालक आहे. भारतातील ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात Excitel हे नाव वेगाने लोकप्रिय होत आहे. किफायतशीर इंटरनेट प्लॅन्स आणि वाढत्या ग्राहकवर्गामुळे कंपनीने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशामागे आहेत कंपनीचे संस्थापक विवेक रैना, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा केला.