Gautam Adani: अदानी अंबानींना देणार टक्कर? मोफत 5G इंटरनेट आणण्याच्या तयारीत; काय आहे प्लॅन?

Gautam Adani Free 5g Internet: सध्या भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओची सत्ता आहे. पण आता जिओला लवकरच टक्कर देण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी लवकरच टेलिकॉम उद्योगात उतरण्याची शक्यता आहे.
Gautam Adani Free 5g Internet
Gautam Adani Free 5g InternetSakal

Gautam Adani Free 5g Internet: सध्या भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओची सत्ता आहे. पण आता जिओला लवकरच टक्कर देण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी लवकरच टेलिकॉम उद्योगात उतरण्याची शक्यता आहे. भारतात स्पेक्ट्रम लिलाव 20 मे पासून सुरू होणार आहे. दूरसंचार विभागाने यासंदर्भात 8 मार्च रोजी नोटीसही जारी केली आहे.

गेल्या स्पेक्ट्रम लिलावात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनीही सहभाग घेतला होता. त्यामुळे यंदाही कोट्यधीश उद्योगपती लिलावात सहभागी होणार असल्याचे मानले जात आहे. अदानी 5G इंटरनेट मिळविण्याची संभाव्य संधी शोधत आहेत.

अदानी समूहाचा डेटा सेंटर विस्तार करण्यावर भर

काही काळापूर्वी गौतम अदानी यांनी कर्मचाऱ्यांसोबतच्या बैठकीत सांगितले होते की, ते त्यांच्या डेटा सेंटरचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत. याशिवाय ते एआय-एमएल आणि इंडस्ट्रियल क्लाउडवरही काम करत आहेत.

Gautam Adani Free 5g Internet
Sbi Net Banking: SBIच्या लाखो ग्राहकांसाठी मोठी बातमी; आज बँकिंग सेवा 1 तास राहणार बंद

गौतम अदानी देशातील 5G ​​इंटरनेटच्या वाढत्या स्पर्धेत सहभागी होण्याचा विचार करत आहेत. दरम्यान, क्वालकॉमचे सीईओ काही दिवसांपूर्वी भारतात आले आणि त्यांनी गौतम अदानी यांची भेट घेतली. गौतम अदानी यांनी या बैठकीची माहिती 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली होती, त्यानंतर ही चर्चा आणखी वाढली आहे.

नवीन कंपनी लवकरच सुरू होऊ शकते?

रिपोर्ट्सनुसार, अदानी लवकरच नवीन कंपनीची घोषणा करु शकतात, परंतु कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Gautam Adani Free 5g Internet
Income Tax: आयकर वाचवायचा आहे? तर 31 मार्चपूर्वी 'या' कर बचत योजनांमध्ये करा गुंतवणूक

आपण या बाजारात प्रवेश करणार असल्याची कोणतीही सूचना अदानी यांनी दिली नसली तरी अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की ते एका नवीन कंपनीची घोषणा करणार आहे. तर कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र आतापर्यंत गौतम अदानी यांच्या टेलिकॉम मार्केटमधील प्रवेशाबाबत कोणतीही मोठी माहिती मिळालेली नाही.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी नुकतेच अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग संदर्भात आणखी एक विधान केले आहे. अदानी म्हणाले की, गेल्या वर्षी जानेवारीत आलेला अमेरिकन फर्म हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल भारताची बदनामी करणारा होता.

ते म्हणाले की, विविध क्षेत्रातील व्यवसाय असलेल्या समूहाला अस्थिर करण्यासाठी हे अहवाल आणले गेले आहेत. मात्र, आम्ही त्याचा जोरदार सामना केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com