
Gautam Adani Salary: गौतम अदानी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील अव्वल अब्जाधीशांपैकी एक असलेल्या अदानी यांना किती पगार मिळाला, हे अदानी समूहाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात उघड झाले आहे. त्यानुसार, त्यांना 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त पगार मिळाला आहे. याचा अर्थ महिन्याला जवळपास 86.75 लाख रुपये पगार मिळतो. विशेष म्हणजे अदानींच्या 9 कंपन्या शेअर बाजारात लिस्ट आहेत, परंतु त्यांना फक्त दोन कंपन्यांकडूनच पगार मिळाला आहे.