
LIC Warns Customers: तुमचीही LIC पॉलिसी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) अलीकडेच आपल्या ग्राहकांना सायबर फसवणुकीबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या LIC पॉलिसीवर बोनस मिळवण्याचा दावा केला जातो आणि त्या बदल्यात तुम्हाला पॉलिसी क्रमांक, बँक तपशील किंवा KYC माहिती विचारली जाते.