LIC Pension : एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा

विशेष म्हणजे पॉलिसी घेतल्यावरच पेन्शन मिळू लागते. ज्या पेन्शनपासून सुरुवात होते, तीच पेन्शन आयुष्यभर मिळते.
LIC Pension
LIC Pensiongoogle

मुंबई : काम करण्याचे ठरावीक वय असते. यानंतर निवृत्ती घ्यावी लागते. पण निवृत्तीनंतर खर्च कसा भागवणार ? म्हणूनच निवृत्तीचे नियोजन आवश्यक आहे.

एखादी व्यक्ती जितक्या कमी वयात सेवानिवृत्तीचे नियोजन सुरू करेल, तितका मोठा निधी ती तयार करू शकेल. भारतात सेवानिवृत्ती नियोजनाचा विचार केला तर ते LICच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही.

LIC आपल्या ग्राहकांना अनेक पेन्शन योजना ऑफर करते. यापैकी एक आहे – LIC सरल पेन्शन योजना. ही एक नॉन-लिंक केलेली, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक तत्काळ वार्षिकी योजना आहे. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. (get lifetime LIC pension by one time investment LIC saral pension scheme)

LIC Pension
IFSC MICR : कोणालाही चेक देण्यापूर्वी त्यावरील या शब्दांचे अर्थ जाणून घ्या

प्रीमियम एकरकमी भरावा लागतो

तुम्ही LIC सरल पेन्शन योजना एकटे किंवा तुमच्या जोडीदारासोबत घेऊ शकता. तुम्हाला यामध्ये एकदाच गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळत राहते. हा प्लॅन घेताना ग्राहकाला एकरकमी प्रीमियम जमा करावा लागतो.

विशेष म्हणजे पॉलिसी घेतल्यावरच पेन्शन मिळू लागते. ज्या पेन्शनपासून सुरुवात होते, तीच पेन्शन आयुष्यभर मिळते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय ४० वर्षे आणि कमाल वय ८० वर्षे आहे. पॉलिसी सुरू झाल्यापासून सहा महिन्यांनंतर कधीही सरेंडर केले जाऊ शकते.

योजना दोन प्रकारे घेतली जाऊ शकते

ही पॉलिसी दोन प्रकारे घेतली जाऊ शकते. एकल जीवन आणि संयुक्त जीवन. सिंगल लाईफमध्ये पॉलिसी एकाच व्यक्तीच्या नावावर असते. पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहते.

पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला मूळ प्रीमियमची रक्कम दिली जाते. दुसरीकडे, संयुक्त जीवनात पती-पत्नी दोघांनाही एकत्र पेन्शन मिळू शकते.

जोपर्यंत प्राथमिक पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहते. त्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या जीवनसाथीला पेन्शन मिळते. जीवन साथीदाराच्या मृत्यूनंतर, मूळ प्रीमियमची रक्कम नॉमिनीला परत केली जाते.

LIC Pension
PPF Claim : मॅच्युरिटीपूर्वीच पीपीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास वारसदारांना कशी मिळेल जमा रक्कम ?

तुम्हाला पेन्शन मिळेल

या योजनेत गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकतात. मासिक पेन्शन किमान १ हजार रुपये, त्रैमासिक पेन्शन किमान ३ हजार रुपये, सहामाही पेन्शन किमान ६ हजार रुपये आणि वार्षिक पेन्शन किमान १२ हजार रुपये आहे.

विशेष बाब म्हणजे पेन्शनच्या कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. समजा तुम्ही ४२ वर्षांचे आहात आणि तुम्ही ३० लाख रुपयांची अॅन्युइटी खरेदी करत असाल तर तुम्हाला १२ हजार ३८८ रुपये मासिक पेन्शन मिळेल. तुम्हाला पेन्शनमध्ये जास्त रक्कम मिळवायची असेल, तर त्यानुसार तुम्ही जास्त रकमेचा एकरकमी प्रीमियम जमा करू शकता.

कर्जही मिळेल

एलआयसी सरल पेन्शन योजनेतही कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. योजना सुरू झाल्यापासून सहा महिन्यांनंतर ग्राहक कर्जासाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्यास, तुम्ही पॉलिसीमध्ये जमा केलेले पैसे देखील काढू शकता. पॉलिसी सरेंडर केल्यावर, ग्राहकाला मूळ किमतीच्या ९५% परत मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com