AGI Infra Ltd : 'या' रिअल इस्टेट कंपनीकडून डिविडेंडचे गिफ्ट, 1 वर्षात 100% परतावा...

एजीआय इन्फ्राचे शेअर्स सध्या 933.65 रुपयांवर ट्रेड करत आहेत. या शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे एका वर्षात दुप्पट केले आहेत.
AGI Infra Ltd
AGI Infra LtdSakal

AGI Infra Ltd : रेसिडेन्शियल, कमर्शियल प्रोजेक्ट सेक्टरमधील रिअल्टी कंपनी एजीआय इन्फ्रा लिमिटेडने (AGI Infra Ltd) होळीपूर्वी आपल्या शेअरहोल्डर्सना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीच्या बोर्डाने गुंतवणूकदारांसाठी अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

एजीआय इन्फ्राचे शेअर्स सध्या 933.65 रुपयांवर ट्रेड करत आहेत. या शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे एका वर्षात दुप्पट केले आहेत. बीएसई वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार एजीआय इन्फ्राच्या संचालक मंडळाने 11 मार्चला आर्थिक वर्ष 2023-24 साठी अंतरिम लाभांश मंजूर केला.

कंपनी 1 रुपयाचा अंतरिम लाभांश देईल, म्हणजेच 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवर 1 रुपयाचा म्हणजेच 10 टक्के अंतरिम डिव्हिडेंड मंजूर केला आहे. एक्सचेंज फायलिंगनुसार, एजीआय इन्फ्राने अंतरिम लाभांशासाठी 20 मार्च 2024 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. अंतरिम लाभांश 8 एप्रिल 2024 पर्यंत दिला जाईल.

एजीआय इन्फ्रा शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,125 रुपये आहे आणि निचांक 433.25 रुपये आहे. एजीआय इन्फ्रा कंपनीचे मार्केट कॅप 1,140.61 कोटी रुपये आहे. एका वर्षात स्टॉकचा परतावा जवळपास 100 टक्के आहे. हा शेअर 6 महिन्यांत 49 टक्क्यांनी वाढला आहे, तर 3 महिन्यांत 11 टक्क्यांनी वाढला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com