

How Diesel Price Rise Can Increase India’s Inflation
esakal
Global Diesel Supply Crisis: Why Stocks Are Falling : सणासुदीच्या काळात जागतिक इंधन बाजारातून चिंताजनक बातमी समोर येत आहे. जगभरातील डिझेलच्या साठ्यावर दबाव वाढत असून, पुरवठा आणि मागणीतील असमतोलामुळे इंधन बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या (IEA) अहवालानुसार, डिझेलच्या पुरवठ्याशी संबंधित अडचणी २०२७ पर्यंत कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या परिस्थितीचा परिणाम जागतिक बाजारासह भारतातील इंधन दरांवर आणि महागाईवर होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.