
Global Tensions Disrupt Job Market: जागतिक तणाव वाढत आहे. विशेषतः मध्य पूर्वेतील परिस्थिती बिघडत चालली आहे, याचा थेट परिणाम भारतावर दिसून येत आहे. भारतीय कंपन्या सध्या प्रचंड दबावाखाली आहेत. या तणावाचा परिणाम नोकऱ्यांवरही दिसून येत आहे. एचआर सर्व्हिसेस फर्म जिनियस कन्सल्टंट्सच्या मते, मे महिन्यापासून सुमारे 63 टक्के कंपन्यांनी नवीन भरती थांबवली आहे किंवा कर्मचारी कपात सुरू केली आहे.