
Gold Silver Price: सोन्याच्या भावात विक्रमी वाढ होत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 270 रुपयांनी वाढून 86,070 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. दुसरीकडे रुपयाने आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली आणि काल शेअर बाजार घसरणीसह बंद झाले.
सराफा बाजारात 99.5 टक्के शुद्धतेचे सोने 270 रुपयांनी वाढून 85,670 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचले. मंगळवारी सोने 85,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.