
Gold and Silver Diwali
Sakal
Gold and Silver Surge Ahead of Diwali: सप्टेंबर महिना संपायला अजून एकच दिवस बाकी असताना सोन्या-चांदीच्या बाजारात अक्षरशः धुमाकूळ सुरु आहे. या महिन्यात दोन्ही सेफ हेवन ॲसेट्समध्ये अशी वाढ अनेक वर्षांनंतर प्रथमच पाहायला मिळत आहे. सोने आधीच 10 टक्क्यांहून अधिक वाढलं, तर चांदीने तब्बल 18 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. दिवाळीला अजून सुमारे 20 दिवस बाकी असताना सोनं 1.25 लाख आणि चांदी 1.50 लाख रुपये या नव्या ऐतिहासिक टप्प्यांवर पोहचणार का? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडत आहे.