
Gold vs Sensex
Sakal
गेल्या एका वर्षात सोन्याने तब्बल 50% परतावा दिला, तर सेंसेक्स 1% घसरला.
तीन, पाच, दहा आणि वीस वर्षांच्या कालावधीतसुद्धा सोनं नेहमीच सेंसेक्सपेक्षा पुढे राहिलं आहे.
महागाईपासून बचाव आणि जागतिक अस्थिरतेतील सुरक्षिततेमुळे सोन्याचं आकर्षण वाढत आहे.
Gold vs Sensex: सोनं हे सुरक्षित गुंतवणुकीचं साधन मानलं जातं. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. गेल्या एका वर्षात सेंसेक्स 1 टक्क्याने घसरला, पण सोन्याने तब्बल 50 टक्क्यांचा परतावा दिला आहे. म्हणजे ज्यांनी गेल्या वर्षी सोने विकत घेतलं, त्यांची गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाली आहे.