

Gold Shock! Why PM Modi Asked Indians to Avoid Buying Gold for 1 Year
eSakal
Modi On Gold: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागरिकांना पुढील एक वर्ष अनावश्यक सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर देशभरातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेअर बाजारापर्यंत याची मोठी चर्चा सुरू झाली. कारण, भारतात सोने हे केवळ दागिना नसून लग्न, सण, गुंतवणूक आणि सुरक्षित बचतीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे 'सोने खरेदी करू नका' असं पंतप्रधानांचे आवाहन अनेकांना आश्चर्यकारक वाटलं. पण मोदींचं हे वक्तव्य प्रत्यक्षात बघितलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्माण झालेल्या मोठ्या संकटामुळे करण्यात आल्याचं सांगितलं जात.