
Gold Price crashes: गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. इराण-इस्रायल संघर्ष सध्या थांबल्याने जागतिक बाजारात सुरक्षित गुंतवणुकीचा (Safe Haven) ओढा थोडा कमी झाला आहे. परिणामी, गुंतवणूकदारांनी सोन्यातून पैसे काढायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे. यामुळे पुढील काही दिवसांत सोन्याच्या किमतीत अजून घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.